
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाने बँकेच्या ठेवी वाढाव्यात, लोकांचा पैसा सुरक्षित रहावा,आणि त्यांना तो योग्य परताव्यासह परत मिळावा यासाठी उपक्रम हाती घेतला होता.प्रत्येक तालुक्यात बँक सक्षम व्हावी यासाठी नूतन संचालक मंडळ सतत प्रयत्न करत आहे.यासाठी संचालक पी.एन.पाटील यांच्या पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात ग्राहक मेळावे घेऊन विविध ठेव योजना,कर्ज सुविधा यांची माहिती देण्याची मोहीम काढण्यात आली.बँकेच्या कोल्हापूर शहरात ११ आणि १२ तालुक्यात म्हणजेच ग्रामीण भागात २६ असे एकूण ३७ मेळावे घेण्यात आले.त्यापैकी फक्त करवीर तालुक्यात २३ कोटी ७९ लाख रुपयांच्या नवीन ठेवी जमा झाल्या आहेत.अशी माहिती संचालिका उदयानी साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्यांमधून ग्राहक सहकारी संस्था यांना ठेव ठेवण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले.तसेच चालू आणि बचत खात्यांमधेही वाढ झाली आहे.शहर आणि करवीर तालुक्यात अनुक्रमे ६८ आणि ५६ टक्के हि वाढ झाली असून १ कोटी ४ लाख रुपयांचे जादा शेअर्स खरेदी झाले.१३० कोटी रुपयांची पीक कर्जे आणि २ कोटी ६५ लाख रुपयांची लघु उद्योगांसाठी कर्जे वितरीत करण्यात आली आहेत.त्याचप्रमाणे महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम बँकेच्या माध्यमातून राबविण्यात आले.ठेवींमध्ये भरगोस वाढ करून करवीर तालुक्याने आघाडी घेतली आहे.असेही उदयानी साळुंखे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस करवीर पश्चिम विभागीय अधिकारी एस.ए.वरुटे,करवीर पूर्व विभागीय अधिकारी एस.पी.पाटील,तपासणी अधिकारी डी.एस.थोरावडे,एस.ए.चौगुले,वाय.पी.पाटील,व्ही.व्ही.कुलकर्णी यांच्यासह बँक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply