
कोल्हापूर : शहरातील 5.60 लाख लोकसंख्येस दैनंदिन पाणी पुरवठा करणेसाठी कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा व भोगावती नदीमधून दररोज 120 द.ल.लि.इतक्या पाण्याचा उपसा करते तथापी यावर्षी राधानगरी व काळम्मावाडी धरणामध्ये एकूण 4.50 टी.एम.सी. इतक्या पाण्याचा साठा शिल्लक आहे. सदरचे पाणी जुन महिन्यापर्यंत पुरविण्याचे नियोजन पाटबंधारे खात्यामार्फत करणेत आले आहे. पाटबंधारे खात्याने धरणातून सोडलेले पाणी महानगरपालिकेच्या शिंगणापूर बंधा-यामध्ये साठते, हे साठलेले पाणी पाटबंधारे खात्याच्या पुढील पाणी सोडणेचे रोटेशन पर्यंत पुरविणे आवश्यक असलेने कोल्हापूर महानगरपालिकेने नदीमधील दैनंदिन पाणी उपसा कमी करणेचा निर्णय घेतला आहे. या परिस्थीतीमध्ये दिनांक 01.04.2016 पासून कोल्हापूर शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करणेचे नियोजन केले आहे. यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा करून पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे
Leave a Reply