
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती म्हणून अजिंक्य शिवाजीराव चव्हाण, उपसभापतीपदी सुरेखा प्रेमचंद शहा यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होतेकोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदासाठी नगरसेवक अजिंक्य चव्हाण व नगरसेविका सौ. पुजा नाईकनवरे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये अजिंक्य चव्हाण यांना 5 मते तर सौ.पुजा नाईकनवरे यांना 4 मते पडली. अजिंक्य चव्हाण यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषित केले. नुतन प्राथमिक शिक्षण समिती सभापती हे प्रभाग क्र.55, पद्माराजे उद्यान या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
यानंतर प्राथमिक शिक्षण समिती उपसभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सुरेखा शहा यांना 5 मते तर सौ.भाग्यश्री शेटके यांना 4 मते पडली. सुरेखा शहा यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची प्राथमिक शिक्षण समिती उपसभापतीपदी निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषित केले. नुतन प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती हे प्रभाग क्र.20, शाहू मार्केट यार्ड या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या
Leave a Reply