अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार:5 जण ताब्यात

 

शिरोळ : तालुक्यातील यड्राव येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार IMG_20160401_172951झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलीला वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आल्याने आठ महिन्यांपासून दडपून राहिलेले हे प्रकरण मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज चव्हाट्यावर आले. पिडीत मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी जाल्या उर्फ पवन वशिष्ट माने रुपेश बाबासो शिंदे  यांच्यासह पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट 2015 मध्ये पिडीत मुलगी घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या  माने आणि शिंदे यांनी  ऊसाच्या शेतात नेवून, तोंडात ओढणीचा बोळा कोंबून बलात्कार केला.  त्यानंतर मुलीसह घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी देवून चार ते पाच वेळा संशयीतांनी अतिप्रसंग केला.  दरम्यान, मुलीच्या पायांना सूज आल्यामुळे तिला  डॉक्टरांकडे नेले. त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी अहवालानुसार पिडीत मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले.  वडील व्यसनाधीन, आई विकलांग, घरची परिस्थिती गरीब  आणि मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोघांवर गुन्हा नोंद करुन पाच जणांना  ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!