
कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर वर दोषरोप निश्चितीचा फैसला आता 11 एप्रिल ला होणार असून पोलीस भरतीमुळे आवश्यक बंदोबस्त नसल्यानं समीर ला आज कोर्टात हजर केले नाही.
विशेष सरकारी वकिलांची अनुपस्थिती असल्याने तपास अधिकाऱ्यांच्या मागणी वरून आजची सुनावणी तहकूब करण्यात आलीतपासा संदर्भातील गोपनीय अहवाल आज न्यायालयात पोलिसाकडून सादर करण्यात आला.आज जिल्हा व सत्र न्यायालयात समीर समीर गायकवाड वर दोषरोप निश्चिती होणार होते , पण विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आज उपस्थित नसल्यामुळे आता 11 एप्रिल ला दोषारोप निश्चित होण्याची शक्यता आहे. न्यायालयात आज गोपनीय तपासाचा अहवाल तपास अधिकारी एस चैतन्य यांनी सादर केला , मागील सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील समीर पटर्वधन यानी समीर ला न्यायालयात हजर करण्याची मागणी केली होती , त्यावर न्यायाधीश एल डी बिले यानी पोलीस प्रशासनाला सुचेना केल्या होत्या पण आज कोर्टात समीर ला हजर न केलेने त्याचे वकिल पटर्वधन यानी पोलीसानी न्यालयाचा अवमान केला आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली , त्यावर त्याला उत्तर देताना सरकारी वकील चंद्रकांत बुधले यानी सध्या पोलीस भरती चालू असून त्यामुळे पोलीस दलाकडे आवश्यक बंदोबस्त नसल्यानं समीर ला आज कोर्टात हजर केले नाही , पुढील सुनावणी दरम्यान आरोपी ला हजर करण्यात येईल असे सांगण्यात आले,
Leave a Reply