
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सर संचालक डॉ.केशव हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला ९,१० आणि ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये जेएनयु वास्तव या विषयावर सर्वोच्च आणि उच्च न्यायालायाच्या वकील आड.मोनिका अरोरा यांचे ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार असून ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचे बाग्लादेशी घुसखोरी यांचे १० एप्रिल ला आणि व्याख्यानमालेतील ३रे पुष्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय एकत्मता या विषयावर डॉ.अशोक मोदक गुंफणार आहेत.अशी माहिती व्यासपीठाचे अध्यक्ष सुभाष वोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्याख्यानमालेचे हे २० वे वर्ष असून यावर्षी व्याप्ती वाढल्याने शाहू स्मारक भवन येथे हि व्याख्यानमाला आयोजित केली आहे असे कार्यवाह उदय सांगवडेकर यांनी सांगितले.लोकोत्तर कार्याची प्रेरणा सतत जागृत राहावी म्हणूनच डॉ.हेगडेवार यांच्या जन्मदिनी म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे असेहि ते म्हणाले.गेल्या १९ वर्षात अनेक दिग्गज आणि प्रगल्भ मान्यवरांची व्याख्याने हिंदु व्यासपीठाने आयोजित केली आहेत.यापुढेही असाच प्रयत्न राहील.असे सुभाष वोरा यांनी सांगितले.
Leave a Reply