कोल्हापूर : शनी शिंगणापुर नंतर साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवनी संस्थेच्या महिलांना गाभा ऱ्यात जाण्यापासून महिला भाविकांनी प्रतिबंध केला.
भूमाता ब्रिगेडने आंदोलन केल्यावर न्यायालयाने महिलांना प्रवेश द्यावा असा निर्णय दिला. याची अमलबजावणी करण्यासाठी सकाळी अवनी संस्थेच्या महिला गाभार्यात देवीची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र या महिलांना श्रीपुजकानी आणि तिथल्या महिला पुजार्यांनीही त्यांना गाभार्यात प्रवेश करण्यापासून रोखून धरलं. यामुळे अवनी संस्थेच्या महिला कार्यकर्त्याही संतापल्या आणि मंदिरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. हा सगळा प्रकार सुरू असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमीता घेतली होती. त्यामुळे अवनी संस्थेच्या महिलांनी तिथेच जोरदार घोषणा बाजी केली आंदोलन केले. तर दुसरीकडे गाभार्यात फक्त राजघरण्यातील महिला आणि पुजारी महिलांना प्रवेश दिला जातो, असं श्रीपुजकांनी सांगितलं आहे. हा वाद पुन्हा कोल्हापूरच्या वाट्याला आला आहे.
Leave a Reply