
कोल्हापूर : जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त सर्व प्रशासकीय यंत्रणांनी करावयाच्या उपाययोजनांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. येथील जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा- 2016 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जोतिबा डोंगर येथे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी सज्ज, सतर्क आणि दक्ष रहावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले,यात्रा कालावधीत जोतिबा डोंगर येथे प्लास्टिक बंदी करण्याबरोबरच वाटी खोबऱ्यांच्या विक्रीसही प्रतिबंध करुन खोबरे बारीक करुन त्यांची विक्री करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच यात्रा काळात पार्किंग व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, दर्शनरांग, बरॅकेटिंग, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य व्यवस्था आदि सर्व व्यवस्थांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापण यंत्रणा अधिक सतर्क केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, दर्शनरांग, गाभारा, मंदिर परिसर तसेच सपूर्ण जोतिबाडोंगर येथे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, याकामी पोलीस तसेच सर्व शासकीय यंत्रणाबरेाबरच सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, तसेच यासाठीचे आवश्यक यंत्रणांना प्रशिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली. जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा येत्या 21 एप्रिलला असून त्यानिमित्त करावयाच्या सर्व उपाययोजनांची विशेषत: सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम येत्या 19 एप्रिलला जोतिबाडोंगर येथे घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक प्रदिप देशपांडे यांनी सांगि
Leave a Reply