
कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लक्ष बाटल्या रक्त संकलन करण्याचा उपक्रम आज हाती घेण्यात आला. कोल्हापुरात अर्धा शिवाजी पुतळ्यास जलाभिषेक करून रक्तसंकलनास प्रारंभ करण्यात आला.
राधाकृष्ण मंदिर,मंगळवार पेठ,जीवनधारा ब्लड बँक, राजरामपुरी, लक्ष्मीपुरी, उत्तरेश्वर पेठ,खरे मंगल कार्यालय, प्रायव्हेट हायस्कूल लाईन बाजार येथे रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. कार्यकर्ते आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद या उपक्रमास मिळत आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई,उपाध्यक्ष राहुल चिकोडे शहर उपाध्यक्ष, हेमंत आराध्ये, डाँ.आलका खाडे, ,डाँ.पूजा सांळुखे,ङाँ.सबना कांबळे कोल्हापूर मेडीकल असोशिएशनचे नुतन अध्यक्ष डाँ.प्रविण हेन्दे,डाँ.पी.एम.चौगुले,डाँ.संदीप पाटील,डाँ.गिरीष कोरे यांच्यसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
Leave a Reply