
मुंबई: मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा विशेष न्यायालयाने प्रमुख दोषी मुजम्मील अन्सारीसह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, अन्य 7 दोषींनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या दरम्यान रेल्वेमध्ये मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले या ठिकाणी भाजी मार्केट लोकल मधे 3 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तब्बल 13 वर्षांनी विशेष न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरवलं होतं. या सर्व दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली.मुजम्मील अन्सारी, फाहीम खोत, वाहीद अन्सारी या तिघांना जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे. साकीब नाचन, असीफ मुल्ला, अमील मुल्ला यांना 10 वर्षांची आणि 1 लाख रूपये दंड तर, अन्वीर अलील, मोहम्मद कामील, नूर मोहम्मद, अन्वर अली यांना दोन वर्ष कारावास आणि 2 हजार रुपये दंड अशी सुनावण्यात आली आहे. त्यात सिमी या दहशतवादी संघटनेचा हात होता.यात 12 लोक मृत्यमुखी पडले होते आणि 17 लोक जखमी झाले होते.
Leave a Reply