
मुंबई : राज्यातील दहा शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करणार आहोतच पण त्यासोबत ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यावरही राज्य शासन भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितल ओरॅकल कंपनीच्या वतीने मुंबईत आयोजित ‘ओरॅकल क्लाऊड कॉन्फरन्स’मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम उपस्थित होते.
स्मार्टसिटीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्मार्टसिटीच्या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागरीकांचे जीवनमान उंचावणे हा प्रयत्न राहणार असून माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शहरे ‘स्मार्ट’ आणि ‘बेस्ट’ करण्यात येणार आहेत. शहरे ‘स्मार्ट’ बनवतानाच राज्यातील गावांचाही विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. राज्यातील गावा-गावात विकासाची गंगा पोहचविणे गरजेचे असून ‘स्मार्ट सिटी’बरोबरच ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. विकासाची गंगा गावखेड्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. राज्यातील शहरांचा आणि गावांचा विकास करत ‘डिजिटल इंडिया’ बनविण्याचे स्वप्न साकार केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणले.
Leave a Reply