विना परवाना होर्डींगवर कारवाई करणार:अतिरिक्त आयुक्त

 

20151214_213947-BlendCollage कोल्हापूर  :- शहरातील विनापरवाना होर्डींग संदर्भात  मा.अतिरिक्त आयुक्त यांनी विनापरवाना होर्डींगवर कारवाई करणेबाबत बैठक बोलाविली.   शहरातील विना परवाना होर्डींग तात्काळ काढून टाकण्याचे आदेश केले आहेत.
  बैठकीमध्ये मंगळवार दि.12/04/2016  पर्यन्त  इस्टेट विभागाने सर्व परवानाधारक होर्डींग नंबर टाकले जातील.  ज्या होर्डींग्जवर इस्टेट विभागाकडून देणेत आलेला होर्डींग्ज नंबर नसेल अशी  होर्डींग्ज अनधिकृत ठरविणेत यावीत व त्यांच्यावर कारवाई करणेत यावी. त्यासाठी चारही विभागीय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसच्या अधिक्षकाच्या अधिनिस्त मुकादम आणि मिस्त्री दैनंदिन फिरती करतील व वॉर्ड आफिस अधिक्षकांना यांना त्याचा अहवाल देतील.  तसेच त्याची एक प्रत इस्टेट विभागालाही देणेत यावी.  प्रत्येक विभागीय कार्यालयाअंतर्गत साप्ताहिक कारवाईचे दिवस ठरविणेत आले आहेत.  त्यामध्ये ज्या होर्डींगवर एजन्सी नाव व होर्डींग्ज नंबर नाही असे होर्डींग विनापरवाना समजून ते काढणेबाबत तसेच शहरात वाढदिवस व शुभेच्छा फक्त विनापरवाना लावले जातात असे सर्व होर्डींग काढणेबाबत चार विभागीय कार्यालयाना दिवस ठरवून दिले आहेत.  
त्यामध्ये  विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदान – प्रत्येक आठवडयातील  बुधवार, विभागीय कार्यालय क्र. 2 शिवाजी मार्केट – गुरुवार, विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपूरी – मंगळवार, विभागीय कार्यालय क्र.4 ताराराणी मार्केट – शुक्रवार असे कारवाई करण्यात येणार आहे.    त्यासाठी कारवाईवेळी इस्टेट विभागाकडील कर्मचारी, तसेच अतिक्रमण विभाग व वर्कशॉप विभागाकडील गॅस कटर, वाहन उपलब्ध करुन संयुक्त कारवाई करणेचे आदेश मा.अतिरिक्त आयुक्तसो यांनी दिले.  तसेच  महानगरपालिका टोल फ्री 1800 233 3568 व 1800 233 4598 वर अनधिकृत होर्डीग्जबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी तात्काळ निरसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या बैठकीस चारही विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.पाटील, एस.के.माने, हर्षजित घाटगे, इस्टेट विभाग अधिक्षक सचिन जाधव, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
                                                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!