स्पीड न्यूज वेबसाईटचे शानदार उद्घाटन

 

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी  वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमास हातकणंगले मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार डॉ. सुजीत मिणचेकर , राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगीता खाडे डॉ. शीतल पाटील IMG-20160408-WA0006यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  तसेच कोल्हापुरातील महत्वाचे नंबर्स आणि माहिती असणारी स्पीड न्यूज डायरी प्रकाशन सोहळा या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.विविध क्षेत्रातील मान्यवर,संघटना पदाधिकारी पत्रकार यांनी शुभेच्छा दिल्या.

  लहानश्या रोपट्याचा उदया वटवृक्ष होईल असे उद्गार आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी काढले.कोल्हापूर स्पीड न्यूज डायरी चे उद्घाटन करताना संगीताताई खाडे म्हणाल्या ही डायरी लोकांना मार्गदर्शक ठरेल. डॉ. शीतल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संपादिका शुभांगी तावरे, कार्यकारी संपादक अक्षय थोरवत, मुख्य पत्रकार पांडुरंग दळवी,टेक्नीकल चीफ शरद पाटील, अमोल भोसले आणि स्पीड न्यूज चे सर्व पत्रकार मान्यवर उपस्थित होते.ब्रॅण्ड अम्बेसीडर तन्वी पाटील हिचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!