
कोल्हापूर :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला घरचा आहेर दिला जनतेला जर अगोदरच्या सरकारची आठवण येत असेल तर आपण नालायक आहोत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर माझ्या सरकारच्या काळात कोणी अस्वस्थ राहता कामा नये अशी अपेक्षाहि त्यांनी व्यक्त केलीय ते कोल्हापुरात खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृति पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात बोलत होते या व्यासपीठावरील सहकारमंत्री चंद्रकांत पाटील याना जनतेच्या भावना समजून घ्याव्यात असे आवाहन हि त्यांनी केले दुष्काळाचे राजकारण न करता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज हि त्यांनी व्यक्त केली सराफ व्यावसायिकांच्या संपबाबत त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले सराफ असो कि शेतकरी सगळ्यांचे प्रश्न सुटणे म्हत्वाच असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सीमावादाच्या मुद्यावरून हि त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज, संजय मंडलिक, महापौर अश्विनी रामाणे, मान्यवर उपस्थित होते
Leave a Reply