
कोल्हापूर: आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणताही भेद नसावा देश धर्मनिरपेक्ष असावा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले.हीच आपली खरी राज्यघटना आहे असे प्रतिपादन आज अॅड शंकरराव निकम यांनी काढले.करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळ आयोजित शोध अंबाबाईचा या भाग ५व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.चांगल्या परंपरा समाजात टिकून राहिल्या पाहिजेत.समाजात जशी बांडगुळ वाढतात तश्या चुकीच्या परंपराही वाढत जातात.स्त्रियांना वेद आणि धर्मशास्त्रात मानाचे स्थान आहे.आपले ४ वेद यात ३९० ऋषींचे लिखाण आहे त्याचबरोबर २८ ब्रह्मवादिनी म्हणजेच स्त्रियांनी लिखाण केले असताना स्त्रियांना मंत्र म्हणण्याचा अधिकार नाकारला जातो.स्त्रियांनी या वेदांमध्ये मार्गदर्शन केले आहे.मनुस्मृती या ग्रंथातही स्त्रियांबद्दल वाईट विचार मांडले गेले.पण मूळ मनुस्मृती ग्रंथात धर्मबांधणी कशी करावी लिहिले असताना त्याच खाली लगेच वाईट गोष्टी कश्या लिहल्या गेल्या म्हणजे या गोष्टी नंतर कोणीतरी समविष्ट केल्या आहेत.असेही अॅड निकम म्हणाले.परंपरेच्या नावाखाली आपण फसविले न जाण्यासाठी आपल्या वेदांमध्ये सती जाणे,देवदासी या परंपरांचा उल्लेखही नाही.या सर्व अलीकडच्या परंपरा आहेत.किंवा कुणीतरी हे मुद्दाम घुसडलेले आहे.संत तुकाराम.नामदेव,चोखोबा या संतांच्या पत्नी,बहिण.मुली यांनी अनेक अभंग लिहिले.जे आपण वाचतो आणि एकतो सुध्दा.यावरून स्त्रियांच्या अध्यात्माची परंपरा दिसते.अध्यात्मात कधीही दुजाभाव सांगितलेला नाही.देशात आत्ता ६७४२ जाती आहेत.पण चारही वेदांमध्ये एकही जातीचा उल्लेख नाही.आपण प्राणी,वनस्पती,दगड,साप यांची पूजा करतो मग जिने आपल्याला जन्म दिला तीलाच का नाकारतो असा सवालही अॅड.निकम यांनी उपस्थित केला.हे लांच्छनास्पद आहे.काहीही बोलून वेदाचे नाव ठोकून द्यायचे आणि परंपरा म्हणून सांगायचे हे बरोबर नाही.
गायत्री हा मंत्र नसून छंद आहे.त्याला मंत्र म्हटले गेले.अशा चुकीच्या परंपरा मोडून काढल्या पाहिजे.खरा अंबाबाईचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी कोल्हापुरात असे व्याख्याने घेऊन शांततेत आंदोलन केले जाते हे कौतुकास्पद आहे शाहू महाराज,फुले,आंबेडकर यांना परंपरेच्या नावाखाली विरोध झाला तरीही सर्वाना एकत्रित घेऊन जाण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला.धर्म तोच जो समाजाला एकत्र आणतो.धर्माची व्याख्या मोठी आहे.हा वैचारिक लढा आहे.त्यामुळे उगाच धर्माचे धिंडवडे निघायला नकोत असे स्पष्ट मत निकम यांनी मांडले.महिलांना पूर्ण अधिकार दिले पाहिजेत.एक स्त्री शिकली की चांगले कुटुंब आणि पर्यायाने चांगले जग निर्माण होते.म्हणूनच भारतीय राज्यघटनेचा आदर केला पाहिजे तेच आपले खरे वेद आहेत असेही अॅड.निकम म्हणाले.
खरा इतिहास समोर येण्यासाठीच हा प्रयत्न आहे असे सह कार्यवाह वसंतराव मुळीक यांनी बोलताना सांगितले.गाभाऱ्यात प्रवेश केला आर्द्रता वाढेल अशी करणे दिली जातात पण देवीला फुलांनी सजविले जाते त्यामुळे देवीचे मूळ स्वरूप झाकले जाते आणि त्यामुळे आर्द्रता जास्त वाढते.तरी नुकतेच देवस्थान समितीने दुष्काळग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली याबद्दल देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी कार्यवाह दिलीप पाटील,इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत,बबनराव रानगे यांच्यासह नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्
Leave a Reply