
कोल्हापूर :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात आज पार पडली संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चित करण्याविषयी या सुनावणीत युक्तिवाद झाला समीर गायकवाडला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर केले , या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली . यावेळी त्यांनी उच्च न्याययाच्या नियंत्रणाखाली या हल्ल्याचा तपास सुरु आहे यामध्ये सध्या प्रगती होत आहे शिवाय सध्य स्थितीत समीर वर आरोप निश्चित होतील असे पुरावे हाती नाहीत त्यामुळे त्याच्यावर दोषरोप निश्चित करू नये अशी मागणी केली आता दखल केलेली चार्ज शीट हि प्रथम दर्शनी असल्याचे न्यायालयात सांगत उच्च न्यायालयात तपासाचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर केल्या जातो, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णय नंतर आरोप निश्चित करण्यात यावे आशी विनंती केली , हि विंनती न्यायालयाने मान्य करत 29 ला पुढील सुनावणी घेण्याचे निश्चित केले समीर चे वकील समीर पटवर्धन यांनी समीर आरोपीची दोषरोप निश्चित करण्याची मागणी असताना आरोप निश्चित होत नाहीत याबाबद्दल नाराजी व्यक्त केली दरम्यान समीर गायकवाड ने जेल मधून न्यायालयाला एक पत्र पाठवले होते , त्या मध्ये त्यांना विनंती केली आहे की अंडसेल मध्ये राहून वेड लागण्याची वेळ अली असल्याचे सांगत इतर कैद्यांशी बोलण्याची मुभा मिळावी आणि प्रत्येक सुनावणीसाठी हजर राहण्याची मागणी केली.
Leave a Reply