
कोल्हापूर : साडे तीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातल्या गाभार्यातही महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात गाभार्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गाभार्यापर्यंत जाऊन देवीचे दर्शन घ्यायला याआधी महिलांना बंदी होती. केवळ राजघराण्यातील महिलांना आणि पुजारांच्या पत्नींनाच गाभार्यापर्यंत जाण्याची परवानगी होती. मात्र, सोमवारी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्य महिला भाविकदेखील देवीच्या गाभार्यात जाऊन दर्शन घेऊ शकतील.कोल्हापूर आणि राज्यभरातील पुरोगामी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने नंतर राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. .न्यायालयाचा आदेश असल्यामुळं गाभारा प्रवेशाचा वाद नको अशी भुमिका मांडत पोलीस निरक्षक अनिल देशमुख यांनी या बैठकीत तोडगा काढला. मात्र, हिंदुत्ववादी संघटना अजूनही विरोधाच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर काही महिलांनी पूजेचे सामान घेऊन थेट गाभार्यात जाऊन देवीचे दर्शन घेतलं
Leave a Reply