
कोल्हापूर : इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी आणि महान नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ४०० व्या स्मृतीदिनानिमित्त येत्या २३ एप्रिल रोजी शेक्सपिअरच्या अनेक गाजलेल्या शोकांतिकेपैकी एक किंग लिअर हे नाटक २३ वर्षानंतर पुन्हा नव्याने रंगमंचावर सादर होत आहे.२३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा प्रयोग होणार आहे अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जगातील सर्वश्रेष्ठ लेखक आणि नाटककार म्हणजे विल्यम शेक्सपिअर.किंग लिअर हे त्यांचे महान नाटक.२३ वर्षापूर्वी प्रत्यय या संस्थेने हे या नाटकाचे प्रयोग भारतभर केले.आता पुन्हा हेच नाटक रंगमंचावर सादर करताना आम्हाला खरच खूप समाधान आणि आनंद होत आहे असे अभिनेते आनंद काळे यांनी सांगितले.३ पिढ्या या नाटकात एकत्रितपणे काम करत आहेत.ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या या नाटकाचा अनुवाद मराठीत अतिशय उत्कृष्ठपणे केला आहे.शेक्सपिअर यांना आदरांजली म्हणून हि कलाकृती सादर आहोत.यात युवा पिढीनेही नाटक समजून उत्तम प्रकारे पेलवले आहे.असे अभिनेते प्रकाश फडणीस यांनी सांगितले.
शुभारंभाच्या प्रयोगावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक व इंग्रजी साहित्याचे गाढे अभ्यासक अच्युत गोडबोले उपस्थित असणार आहेत.या नाटकाच्या निर्मितीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्रालयाकडून भारत सरकार यांचे अनुदान मिळाले आहे.असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला अभिनेते समीर दैनी,अभय मणचेकर,चित्रा खरे,रोहीत पोतनीस यांच्यासह नाटकातील सहकलाकार उपस्थित होते.
Leave a Reply