
कोल्हापूर : जगाला आशीर्वाद देणेसाठी आणि नवीन अध्यात्मिक जीवनाच्या प्रसारणांसाठी अनादी काळापासून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या अचूक वेळी सर्व साधकांसह उच्च आत्मे हिमाचल,तिबेट पर्वत,शृंखलाच्या पायथ्याशी एकत्रित येवून सामुहिक ध्यान साधना करतात.त्यावेळी प्रचंड अध्यात्मिक उर्जा प्रमाणात खाली येते.या प्रक्रियेत सर्व साधकांवर दैवी प्रकाश शक्ती आणि प्रेम याचा मोठ्या प्रमाणावर वर्षाव होतो.ज्यामुळे मान शुद्ध होऊन उत्साह उर्जा आनंदाने शरीर मान भरून जाते.आणि नकारात्मक विचारांचा नाश होतो.याच ध्यानसाधनेसाठी प्राणिक हिलिंग आणि अर्हटिक योग सेंटर कोल्हापूर शाखेच्या वतीने वर्षातून एकदाच येणाऱ्या वैशाख पौर्णिमेनिमित्त सामुहिक वैशाख ध्यानसाधना येत्या शुक्रवारी दसरा चौक येथे सकाळी ९ ते ११.३० यावेळेत होणाऱ्या वैश्विक शांती आणि मानसिक ,सामाजिक उन्नतीच्या अनुभवाच्या सर्वांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जी.एम.सी.के.एस. प्राणिक हिलिंग सेवा संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
प्राणिक हिलिंग हे मानवी शरीरास स्पर्श न करता उर्जा शरीर किंवा प्राणमय कोश यावर उपचार करणारे शास्त्र कला आहे.संपूर्ण जगभरात मानवी स्वास्थ्याकरिता प्राणिक हिलिंग सक्षमपणे कार्यरत आहे. या ध्यानसाधनेचा व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात याचा फायदा होतो.तरी यासाठी सकाळी ९ वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.यानंतर प्रसाद वाटप होणार आहे.
पत्रकार परिषदेला संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरण सारडा,उपाध्यक्ष प्रकाश पाटील,प्रकाश पोवार,उद्धव जगताप,राजन यादव,कांचन पुजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply