सहजसेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्राची जय्य्द तयारी; उपक्रमाचे सलग सोळावे वर्ष

 

IMG-20160414-WA0007कोल्हापूर : मागील सलग १५ वर्षाप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील सहजसेवा ट्रस्टच्या वतीने जोतीबा चैत्रपोर्णिमा यात्रेनिमित्त १९ एप्रिल ते २२ एप्रिल या दरम्यान मोफत अन्नछत्र उपक्रम जोतीबा परिसरातील गायमुख येथे राबविला जाणार आहे.येत्या २१ एप्रिल रोजी जोतीबा चैत्र यात्रा भरत आहे.या यात्रेस लाखो भाविक येतात.आंध्रप्रदेश,कर्नाटक आणि महाराष्ट्रातून लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात.हजारो भाविक वस्तीला येतात.त्यांची गैर सोय होऊ नये म्हणून मोफत भोजन व्यवस्था सहजसेवा ट्रस्ट दरवर्षी करत असतो.मागील वर्षी २ लाख भाविकांनी याचा लाभ घेतला.महाराष्ट्रातील हि मोठी यात्रा आहे.सहजसेवा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे यात्रेला आलेला भक्तवर्ग कधीच उपाशी रहात नाही.

शुद्ध पाण्याची सोय शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने करण्यात आली आहे. पाऊस पडला तर भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ हजार चौरस फुटाचा मांडव घातला आहे.चहा मठ्ठा यासाठी वेगळा मांडव उभारला आहे.स्त्रियांच्या आंघोळीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रेच्या निमित्ताने केवळ अन्नछत्र नाही तर सामाजिक सेवेचा मानदंड निर्माण होत आहे.अशी माहिती सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्थ सन्मती मिरजे पत्रकारांशी बोलताना दिली.४ दिवसाच्या या उपक्रमासाठी शेकडो कार्यकर्ते महिन्यापासून दिवसरात्र मेहनत करत असतात.तसेच अन्नधान्य आणि साहित्य यांचा मोठ्याप्रमाणात व्यक्ती आणि संस्थांकडून ओघ सुरु असतो.गेली १५ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे.यामुळे भाविकांमध्ये समाधान आहे.तसेच या उपक्रमास ज्यांना सढळ हाताने मदत करायची आहे त्यांनी सहजसेवा ट्रस्ट,आशिष चेंबर्स,बसंत बहार रोड फोन-०२३१ २६६५५५७ येथे संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!