
कोल्हापूर : इंग्रजी विषयात नेट सेट परिक्षा उत्तीर्ण होणे कोल्हापूरमधील नेट सेट अकँडमीमुळे आता सहज शक्य होणाराय. अशी माहिती या अकँडमीचे संस्थापक डॉ. इब्राहिम मुल्लाणी यांनी दिली. अकँडेमीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या इंग्रजी विषयातील 20 पुस्तकांचा संच प्रकाशन समारंभात डॉ. मुल्लाणी यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, आज बाजारात इंग्रजी विषयातील अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु कुठलेचं पुस्तक परिपूर्ण ठरत नाही. म्हणून या अकँडमीने अथक परिश्रम करून तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने 20 पुस्तके संपादित केली आहेत. ही पुस्तके बदलत्या स्वरूपात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून निर्माण करण्यात आली आहेत. A Companion Guide to NET SET Examination या शीर्षकाखाली ही पुस्तके W.W.W. netsetacademy.COM या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच प्रश्नांचा भरपूर सराव व्हावा म्हणून पेपर 2 व 3 च्या सराव प्रश्नपत्रिका दर रविवारी दोन या प्रमाणे येणा-या सेट व नेट परीक्षेपर्यंत वरील संकेतस्थळावर मोफत उपलब्ध होणार आहेत. शिवाय 2004 पासून आजतागायतच्या सर्व प्रश्नपत्रिका पुस्तकाच्या स्वरूपूात मोफत डाउनलोड करता येणार आहेत. या अकँडमीमुळे कमी कालावधीत बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत. दिशाहीन अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी अकँडमीने प्रकाशित केलेली पुस्तके व सराव प्रश्नपत्रिका यांचा निश्चित उपयोग होईल, असे मत काही तज्ञांनी व्यक्त केला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी नेट सेट अकँडमीचे संस्थापक चेअरमन डॉ. इब्राहिम मुल्लाणी, प्रा. चौगुले पी. एस., प्रा.डॉ. किल्लेदार, प्रा. आर.पी. देठे, प्रा. डॉ. शकील शेख, प्रा. मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply