
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग समिती निवडीवरून पक्षादेश डावलल्याचा आरोप करत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कार्यकर्त्यासह जाऊन शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते नियाज खान यांच्या घराची तोडफोड केलीय या प्रकरणी नियाज खान यांनी पोलिसात तक्रार दखल केली असून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिलाय तर कालच आमदार राजेश क्षीरसागर यांनी चारही नगरसेवकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती या चारही नगरसेवकांनी भाजप ताराराणी आघाडीला सहकार्य केल्याची टीका होत असून त्यावरूनच हा वाद रंगल्याचे बोलले जातंय आज सकाळी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तरीही आज सायंकाळी नियाज खान यांच्या घराची तोडफोड करण्यात आली नियाज खान यांच्या सोबत शिवसेनचे चारीही नगरसेवक असून त्यांनी याला जशाच तसे उत्तर देण्याचा इशार दिला आहे त्यामुळे येत्या काळात हा वाद आता चांगलाच रंगणार आहे
Leave a Reply