
कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळाला तर शेती आणि शेतकरी दोन्ही टिकतील, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांच्या मालाला चांगला दर मिळावा, नवनवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती व्हावी यासाठी त्यांना सहाय्यभूत ठरेल असे कृषी भवन कोल्हापूर जिल्ह्यात उभे करण्यात येईल. त्यासाठीचा आराखडा तयार करावा. कृषी व पणन विभागाकडून निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत कृषी व पणन विभाग, आत्मा आणि स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खरेदीदार, विक्रेता संमेलन व खरीप हंगाम बियाणे विक्री महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री कार्यक्रम यांचे उद्घाटनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, नगरसेवक अशोक जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.
कृषी विकासामध्ये शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, यासाठी शासन आग्रही असून, शासनाने अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण पिक उत्पादनाचे कृषी महोत्सव भरवावेत व शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ व्हावा, असे सागून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने 100 आठवडी बाजार भरविण्याचे निश्चय केला असून, त्याद्वारे शेतकरी संघटीत होतील व शेतकरी ते ग्राहक थेट विक्री हा हेतू साध
Leave a Reply