
कोल्हापूर : देशात महिला संरक्षणाचे अनेक चांगले कायदे आहेत. त्यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास महिलांमधील आत्मविश्वास वाढील लागेल. त्यासाठी या कायद्यांबद्दल जनजागृतीसाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने ‘महिला आयोग तुमच्या दारी ‘ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महिला उपक्रमाशी संबंधित शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी, समुपदेशक, पोलीस विभागावारातील महिलांसाठी सुरु असलेल्या कक्षातील समुपदेशक यांच्याकरीता महिलांचे हक्क व समस्याबाबत माहिती देण्याच्या दृष्टीने राज गौरव मंगल कार्यालयाशेजारी महालक्ष्मी हॉलमध्ये विभागीय कार्यशाळा आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक संजयकुमार वर्मा, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे, सांगलीचे पोलीस अधिक्षक सुनील फुलारी, आयोगाच्या सदस्या वृंदा किर्तीकर,सहदिवाणी न्यायाधीश (वरीष्ठस्तर) तथा प्रभारी सचिव विधी सेवा प्राधिकरण न्या. उमेशचंद्र मोरे, पिंपरी-चिंचवडच्या सभागृह नेत्या उमा खापरे, उपसचिव श्री. गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे असल्याने येणाऱ्या महिला या मुंबई व शहरी परिसरातील प्रामुख्याने असतात. ग्रामीण भागातील गरजू व समस्याग्रस्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने विभागीय स्तरावर कार्यशाळा व सुनावण्या घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगून विजया रहाटकर म्हणाल्या, महिलांच्या अनेक समस्या उत्तम मध्यस्थी व समुपदेशाने सुटू शकतील. त्यामुळे पोलीस यंत्रणा व न्याय यंत्रणांवरील ताण कमी होऊन अनेक संसार उध्दवस्त होण्यापासून वाचतील. यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना शासकीय यंत्रणांशी जोडण्याचे काम आयोग करणार आहे. विशाखा गाईड लाईननुसार स्थापन झालेल्या समित्यांनाही बळकट करणे आवश्यक
Leave a Reply