
कोल्हापूर : गेल्या २ वर्षात संसदेत तब्बल ५३८ प्रश्न मांडत देशातील टॉप थ्री खासदारांमध्ये निवड होणे हा कोल्हापूरचा सन्मान आहे त्याचप्रमाणे जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आज सार्थ ठरला असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले.खासदार पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या २ वर्षातील केलेल्या कामाचा लेखाजोखा आज पत्रकार बैठकीत त्यांनी मांडला.५३८ प्रश्न संसदेत मांडले.त्यापैकी अनेक प्रश्नांची दाखल केंद्र सरकारने घेतली आहे.अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर देशातील टॉप थ्री खासदारांमध्ये निवड होणे ही कोल्हापूरसाठी सन्मानाची गोष्ट आहे.या प्रश्नांपैकी विमानतळ,कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणे,पंचगंगा नदी प्रदूषण,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या,ग्रामीण भागातील रस्ते,देशातील शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड अशा अनेक प्रश्नांसाठी खासदार महाडिक यांनी आवाज उठविला आहे.त्यापैकी विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर आहे.कोकण रेल्वे कोल्ह्पुरला जोडण्यासाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे.त्याचप्रमाणे कोल्हापूरचे ब्रांडीग होण्यासाठी कोल्हपुरमध्ये प्रवेश करण्यासाठी फ्लायओव्हरच्या बांधणीसाठी १७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.तसेच भविष्यात पिंक कोल्हापूर म्हणजेच अॅनोमिया मुक्त कोल्हापूर होण्यासाठी खासदार ग्राम आरोग्य संवर्धन कार्यक्रम या अंतर्गत गावोगावी आरोग्य शिबिरे आणि तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.गडकोट किल्ले संवर्धन आणि सरंक्षण याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.असेही खासदार धनंजय महाडीक यांनी सांगितले.कोणतेही पद नसताना सत्तेत नसताना सामाजिक कार्य आणि अफाट जनसंपर्क याच्या जोरावर महाडिक खासदार पदी निवडून आले. संसदेत कोणताही अनुभव नसताना कोल्हापूरसह राज्य आणि देशपातळीवरील प्रश्न कमी अवधीत संसदेत मांडले.खासदार या पदाला त्यांनी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी झटत राहीन असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.केंद्र सरकारवर शेतकरी नाराज आहे.कोणतीही समाधानकारक निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला नाही. सराफ व्यावसायिक यांचाही प्रश्न प्रलंबित आहे.त्यामुळे अच्छे दिन आलेले नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार बैठकीला रामराजे कुपेकर,नगरसेवक सत्यजित कदम मिलिंद धोंड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply