कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील उपाध्यक्षपदी संतोष पाटील

 

20160518_174902-BlendCollageकोल्हापूर  : कोल्हापूरातील पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील तर उपाध्यक्षपदी पुढारीचे बातमीदार संतोष पाटील यांची एक मतदाने निवड   झाली.  कार्याध्यक्षपदी झी चोवीस तास चे  प्रतिनिधी प्रताप नाईक व सचिवपदी पुण्यनगरीचे बातमीदार बाबुराव रानगे यांची निवड झाली

मावळते अध्यक्ष विकास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार सोपान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवनमध्ये या निवडी झाल्या. संस्थेचे कार्यालय स्वजागेत स्थालांतर करणे, किमान दहा लाखांचा निधी जमा करणे आणि पत्रकारांसाठी अभ्यासवृत्तीची जोपासना होईल अशा कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करण्याचा मनोदय निवडीनंतर नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.  नव्या कार्यकारिणीवर सर्वांनी टाकलेली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडू अशी ग्वाही उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली. सुनिल पाटील, प्रिया सरीकर यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

अन्य कार्यकारिणी अशी-खजिनदार – राहूल खाडे ( मुक्त पत्रकार), सहसचिव – सुरेश आंबुसकर (जनप्रवास), प्रसिध्दीप्रमुख-संदिप राजगोळकर (आयबीएन-लोकमत), सदस्य असे एम. डी. पाटील राहूल जाधव (महाराष्ट्र टाइम्स), प्रिया सरीकर (पुढारी), सुनिल पाटील, बी. डी. चेचर, व भीमाशंकर वाघमारे (सकाळ), राजाराम लोंढे (लोकमत), महेश गावडे, विजय यादव (तरुण भारत), पी. ए. पाटील (पुण्यनगरी), अश्विनी टेंबे (केसरी), समीर मुजावर (नवशक्ती), इलेक्ट्रॉनिक माध्यमे – अमोल माळी (बी न्यूज) सुभाष गायकवाड (एसपीएन न्यूज)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!