आयजीटीआर यांच्या सहकार्याने औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविणार : कुलगुरु

 

igtrकोल्हापूर : इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीन्ही जिल्हयांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु   प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.  शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील आयजीटीआर या संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर.मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ.अजित थेटे, डॉ.अजित थेटे, डॉ.जी.एस.कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे पुढे म्हणाले, भविष्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स् विद्यापीठामध्ये उभारले जाणार आहे.  आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीचे आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल.  त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही दिले जाणार आहे.  उद्योग व्यवस्थेनेही कोणत्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे विशद करणे आवश्यक आहे.  यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!