कोल्हापूर: दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भाजपने काँग्रेस भवनावर धडक मोर्चा काढत राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा निषेध नोंदवला. “देशाची प्रतिमा मलीन केली” असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
