कोल्हापूर : खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तसेच महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार, दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वीकारण्यास नकार दिल्याने, निषेधाच्या प्रतीकात्मक स्वरूपात ते निवेदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आले.
यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यात काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
