
मुंबई : बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जगाने आचरणात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात,भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांची संपूर्ण विश्वाला गरज आहे. दया, अहिंसा,शांती, मानवतावाद आणि समानता या चिरंतन तत्त्वांनी जीवन सहज–सुंदर करता येते.बुद्धांच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानाचा जगाने अंगिकार केल्यास दहशतवादासारखी समस्याही दूर होऊ शकते. सत्य आणि अहिंसा यांचा मार्गच माणसाला निरंतर सुखाची प्राप्ती करून देतो, असा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे संपूर्ण जीवनच जगाला प्रेरणादायी आहे
Leave a Reply