
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्याशी निगडीत महाराष्ट्रातील 50 स्थळे विकसित करण्याचे शासनाने ठरविले आहे. यामध्ये माणगाव येथील स्मारकाचाही समावेश आहे. त्यासाठीचा आराखडा तात्काळ सादर करावा यातील मुख्य स्मारकाच्या ठिकाणाशी निगडीत कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी तात्काळ देण्यात येईल तसेच याबाबतचा समग्र आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात येऊन त्यास मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
माणगाव येथील स्मारकासंबंधी जिल्हाधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, हातकणंगले तहसिलदार दिपक शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य डॉ. कृष्णा किरवले, डॉ. इंद्रजीत सावंत, इंद्रजीत भालेराव, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी विभागीय जातपडताळणी समिती क्र. 2 विजयकुमार गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या स्मारकासाठी समिती गठीत करण्यात आली असून या समितीने टप्प्या टप्प्याने विकसीत करता येईल असा आरखडा तात्काळ सादर करावा. असे सांगून राजकुमार बडोले म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या 125 व्या जयंती निमित्त स्मारकाचे काम तात्काळ चालु करण्यासाठी 5 कोटीचा निधी देण्यात येईल त्यासाठी समितीने 15 दिवसाच्या आत आरखडा पाठवावा. यामध्ये मुख्य स्मारकाच्या ठिकाणच्या कामाचा समावेश असावा
Leave a Reply