कोल्हापूर : महालक्ष्मी को- ऑप बँकेची निवडणूक एका दिवसवर येऊन ठेपलेली आहे. येत्या रविवारी 22 मे रोजी 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत श्री महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेलच विजयी होणार असा विद्यमान संचलकाना विश्वास आहे. याबद्दल बोलताना विद्यमान अध्यक्ष विनोद डिग्रजकर म्हणाले की बँकेच्या सुज्ञ सभासदांनी नेहमी सत्तारूढ पॅनेलला विजयी केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे ती अधिक भक्कम करण्यासाठी सभासद आमच्या पॅनेललाच प्रचंड बहुमताने निवडून देतील.नजीकच्या काळात बँक मल्टीस्टेट तसेच शेड्युल्ड दर्जाची होईल यासाठी हे पॅनेल सतत प्रयत्नशील राहील.ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली धडाडीने व निश्चित ध्येयाने वाटचाल करणारे तरुण तसेच परिपक्व विचारांचे अनुभवी आणि युवा अशा जुन्या आणि नव्यांचा संगम असणारे पॅनेल आम्ही तयार केले आहे असे विद्यमान संचालक आणि माजी अध्यक्ष महेश धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला विद्यमान उपाध्यक्ष संदीप कौलकर,संचालक राजेंद्र किंकर,नरेंद्र खासबारदार,रवी शिराळकर,विद्यमान संचालिका मेघा जोशी,लक्ष्मण नासिराबादकर यांच्यासह सर्व विद्यमान संचालक आणि उमेदवार उपस्थित होते.


Leave a Reply