कोल्हापूर: कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य निवड (फिडे अंतरराष्ट्रीय गुणांकन) खुल्या बुद्धिबळ स्पर्धा येत्या २५ ते २९ मे दरम्यान कोल्हापूर बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित केल्या आहेत.नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे या स्पर्धा संपन्न होणार असून बँक ऑफ महाराष्ट्र हे मुख्य प्रायोजक आणि एस.जी.फायटो फार्माचे संस्थापक आयुर्वेदाचार्य कै.शंकरराव पित्रे यांच्या स्मरणार्थ पित्रे कुटुंबीय सहप्रायोजक आहेत.ही स्पर्धा लिग पद्धतीने एकूण ९ फेऱ्यात होणार असून यातून येणाऱ्या पहिल्या चार बुद्धिबळपटू यांची निवड राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.ते राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील.तसेच नवोदित बुद्धिबळपटू यांना अंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवण्याची व गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू यांना गुणांकन वाढविण्याची स्थानिक खेळाडूंना संधी मिळणार आहे.अशी माहिती कोल्हापूर बुद्धिबळ संघटनेचे सचिव भरत चौगुले यांनी दिली.
या स्पर्धेसाठी एकूण ५० हजार रुपयांची रोख बक्षिसे असणार आहेत.फक्त महाराष्ट्रातील स्पर्धक यात भाग घेऊ शकतात.बाहेरगावच्या स्पर्धकांसाठी रहाण्याची सोय करण्यात आली आहे.निवड झालेल्या स्पर्धकांना ५०० रुपये आणि इतरांना एक हजार रुपये इतके प्रवेश शुल्क असून २४ मे पर्यंत इच्छुकांनी नाव नोंदणी भरत चौगुले ९८५०६५३१६०,रवींद्र पाटील ९८५०८३९८७०,प्रीतम घोडके ९९२२४८२५४१,उत्कर्ष लोमटे ९९२३०५८१४९ आणि निहाल मुल्ला ९४२००१०२३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अनिल राजे,जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्विविजय खानविलकर,प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजय मनियार,सहप्रायोजक किशोर पित्रे,सतिश पित्रे आणि राजेंद्र पित्रे,संघटनेचे उत्कर्ष लोमटे,प्रीतम घोडके,धनंजय इनामदार आणि प्रशिक्षक दत्ता मोरे यांच्यासह बुद्धिबळपटू उपस्थित होते.

Leave a Reply