
कोल्हापूर: राज्यातील मराठवाड, विदर्भ, सोलापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा तडाखा बसल्याने तेथील जनतेस संकटांचा सामना करावा लागत आहे. या भागातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी कोल्हापूरच्या देवस्थान व्यवस्थापन समितीने 9 मे 2016 च्या समिती सभेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस श्री महालक्ष्मी देवस्थानतर्फे 25 लाखाचा निधी देण्याचे मंजूर करण्यात आले होते. त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज दिनांक 25 मे 2016 रोजी 25 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, सदस्या सौ. संगिता खाडे, सचिव शुभांगी साठे हे उपस्थित होते.
Leave a Reply