
कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या शिवाजी विद्यापीठाला ‘रोटरी समाज सेवा पुरस्कार‘प्रदान करण्यात आल्याने खरे तर या पुरस्काराचीच उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीनिवास मालू यांनी आज येथे काढलेरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठास ‘रोटरी समाज सेवा पुरस्कार २०१५-१६‘ श्री. मालू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. राजाराम महाविद्यालयाच्या श्री. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यवेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत उपस्थित होते
Leave a Reply