
कोल्हापूर : गोकुळच्या सॅटेलाईटचे काम संपूर्ण देशभरात आदर्शवत असून, अत्यंत मेहनत, कष्टाच्या जोरावर, कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ऑनलाईन पेमेंटच्या सोई-सुविधा गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्त्युत्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे गोकुळच्या सॅटेलाईट डेअरी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक, गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, तज्ञ संचालक विजय भा. तथा बाबा देसाई, रामराजे कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, अश्विनी जिरंगे, सरपंच स्वाती पाटील, सुवर्णा अपराज, माजी चेअरमन अरुण नरके तसेच अरुण डोंगळे, महानंदचे माजी चेअरमन विनायकराव पाटील, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, तसेच राहूल घाडगे, अनिलराव यादव, जिल्हा उपनिबंधक खाडे, केडीसीचे निंबाळकर, रविंद्र आपटे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, राज्याच्या दुष्काळी परिस्थितीतही कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने आपले प्रमाण टिकवून ठेवले आहे. दुग्धोत्पादनाच्या जोडधंद्याचा उपयोग शेतकऱ्यांनी कोल्हापुरात करुन घेतला आहे. कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे अनुदान दिले जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदानासाठी नेमलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार महाराष्ट्रात एक ब्रँड नियुक्त करता येईल का हे पाहुन अनुदान देण्याबाबत विचारकरता येईल, दूध दरवाढीबाबत धोरणात्मक निर्णयाचा विचार करता येईल. या व्यवसायात शासनाचा हस्तक्षेप कमीत कमी असावा किंवा असूच नये असा विचार असून, शासनाच्या माध्यमातून हे काम न करता ते सहकाराच्या माध्यमातून करण्याचा विचारही असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एका दिवसाला 12 लाख लिटर दूध संकलन हे मेहनतीचे काम आहे. 1 जुलैनंतर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत आदिवासी, आश्रमशाळांना टप्प्याटप्प्याने दुधाच्या पावडरचे दूध देण्याचा निर्णय घेतला जाईल. दुग्धोत्पादनातील दर्जेदार पदार्थांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन विचार करेल. दुधाच्या भेसळीबाबत चिंता व्यक्त करुन ते म्हणाले, भेसळ तपासणीसाठी अत्यंत माफक दरात ग्राहकोपयोगी साहित्य निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच टोल फ्री क्रमांकही देण्यात येणार आहे. भेसळीबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक असून, कायद्यात बदल करावा यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळचे वासरु संगोपनासारखे उपक्रम चांगले असून, अधिक उत्पादन देणाऱ्या दीर्घकालीन गाई-म्हशींची निर्मिती याबाबत विचार करण्यात येईल तसेच पूर्वीच्या योजनेचे पुनरुज्जीवन करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच अनुदानाबाबत विचार करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्यास शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाची परफेड करता येईल. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे व पुढे राहील असे सांगून गोकुळच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभ
Leave a Reply