प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू:महसूल व पुनर्वसन मंत्री खडसे

 

IMG_20160530_122546कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र आणखी वाढविण्याच्यादृष्टीने तमनाकवाडा पाणी परिषद महत्त्वाची ठरेल असे सांगून नागनवाडी प्रकल्पासंबंधीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण व्यक्तीश: पुढाकार घेवू व प्रकल्पग्रस्तांना न्याय देवू असे प्रतिपादन राज्याचे महसूल व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथे चिकोत्रा खोऱ्यातील ज्वलंत पाणी प्रश्न सोडविण्यासाठी व नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनासह पूर्ण करण्यासाठी सर्व पक्षीय पाणी परिषद 2016 चे महसूल व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजन करण्यात आले होते.

पाणी परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबीटकर, भाजपचे प्रवक्ते माधवराव भंडारी, संजय मंडलीक, समरजीत घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, विजय देवणे, उत्तम कांबळे, संयोजक परशराम तावरे, आनंदराव पाटील, अंबरीश घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागनवाडी प्रकल्पासंदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी एक स्वतंत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल, त्यांनी हे प्रश्न एका वर्षात निकाली काढावे त्यासाठी आवश्यकता भासल्यास नियमांमध्ये बदल करण्यात येईल असे सांगून एकनाथ खडसे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे अधिक संवेदनशीलपणे समजून घेणे आवश्यक आहे. भावनिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विस्थापीत होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची तुलना इतर समस्यांशी होवू शकत नाही. सामाजिक जाणीवेचे भान ठेवून त्याग करणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी मंत्रालयात दर तीन महिन्यांनी बैठक घेवून आढावा घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात मुलकीपड जमीनीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असून, ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यात जमिन आहे पण त्याची मालकी शासनाकडे आहे अशा सर्व मुलकीपड जमिनीची मालकी येत्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडील एनए नसणाऱ्या जमिनींचा प्रश्न कमीत कमी दंडाची आकारणी करण्यात येवून सोडविण्यात येईल असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!