

संबधीत कर्मचाऱ्यास प्राप्त तक्रारीचा आढावा घेवून तक्रार 24 तासात निर्गत करावी लागणार आहे. जर कर्मचाऱ्यांने तक्रार वेळेत निर्गत केली नाही तर सदरची तक्रार वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होईल. त्यामुळे संबधीत कर्मचाऱ्यास प्राप्त तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही ठेवणे आवश्यक राहणार आहे.
नागरिकांनी या क्रमांकावर सार्वजनिक स्वच्छता, लाईट, पाणी पुरवठा, ड्रेनेज वगैरे तक्रारी नोंदवाव्यात. वैयक्तिक अथवा कोर्ट केसेस सुरु असलेल्या तक्रारी नोंदवू नयेत. तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी 1913 या क्रमांकाद्वारे नोंदवून या सेवेचा लाभ घ्यावा असे महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply