काहे दिया परदेस या झी मराठीवरील मालिकेतील कलाकारांनी कोल्हापुरकरांशी साधला मूक्त संवाद

 

IMG_20160607_175122कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रात कमी कालावधीत लोकप्रिय झालेली झी मराठी वाहिनीवरील काहे दिया परदेस या मालिकेतील कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी कोल्हापुरकरांना मिळाली. या मालिकेतील शिवच्या भुमिकेतील रिषी सक्सेना, गौरी म्हणजे सायली संजीव आणि नाचीकेतदादा यांची भूमिका करणारे सचिन देशपांडे हे कलाकार कोल्हापुरात आले होते.यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात यांनी कोल्हापुरकरांशी मुक्त संवाद साधला.याआधी त्यांनी कोल्हापुरातील प्रसार माध्यमांशी संवाद साधला.पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत दिलखुलास गप्पाही रंगल्या.

शिव आणि गौरी या दोघांची निवड ऑडीशनद्वारे करण्यात आली.मोहन जोशी,शुभांगी गोखले यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली हेच आमचे मोठे भाग्य आहे असे शिव आणि गौरी यांनी सांगितले.जयपूरचा रिषी म्हणजेच शिव यालाही महाराष्ट्र आणि त्यानंतर मुंबईत मालिकेत दाखविल्याप्रमाणेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.आता थोडे मराठी येते पण मराठी भाषा मी नक्की शिकणार आहे असे रिशीने स्पष्ट केले.शिव आणि माझे ट्युनिंग चांगले जुळले आहे.यामुळे काम करताना फार काही अडचणी येत नाहीत.सेट वरील ज्येष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे अधिक शिकायला मिळत आहे.असे गौरीने म्हणजेच सायलीने स्पष्ट केले. महारष्ट्रात परप्रांतीय म्हणजेच बाहेरून येणारे लोक हा मोठा गहन विषय बनलेला आहे.कुठल्याही राज्यापेक्षा आपण सारे आधी भारतीय आहोत हे जाणले पाहिजे. यावरच भाष्य करणारी हि मालिका आहे असे नाचीकेतदादा म्हणजे सचिन देशपांडे यांनी नमूद केले.यानंतर झालेल्या कार्यक्रमासही कोल्हापूरच्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.आम्ही सारे खवय्ये फेम संकर्षण याच्या सूत्रसंचालनास प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!