मुंबई :
राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे यांची शनिवारी निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरातून अशा पध्दतीने राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले पहिलेच खासदार म्हणून संभाजी राजे यांची निवड झाली आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या निवडीनंतर आता कोल्हापुरला दोन खासदार मिळाले आहेत.मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यभर आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. यापूर्वी २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुक लढविली होती. मात्र, त्यावेळी त्यांना यश मिळाले नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचे जाहीर केले. कोल्हापुरात त्यांची निवडीची वार्ता समजल्यावर राजे समर्थकांनी जल्लोष केला

Leave a Reply