
कोल्हापूर : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या विरेंद्र तावडे याची सीबीआय कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विरेंद्र तावडेला एसआयटी ताब्यात घेणार असल्याची शक्यता आहे.एसआयटीने कोल्हापूर सत्र न्यायालयात याविषयी अर्ज केला आहे. विरेंद्र तावडेची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. तसंच कोल्हापूर पोलीसही तावडेची कस्टडी मागणार आहे. तावडेच्या घरी छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची लिस्ट लागली आहे. या लिस्टमध्ये काही पोलीस अधिकार्यांची नावं समोर आली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही तावडेची चौकशी होणार असल्याची शक्यता आहे. सीबीआयचं पथक कोल्हापूरमधे आज दाखल झालेल आहे. हे पथक 30 जणांची गुप्तपणे चौकशी करत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Leave a Reply