महापालिका घरफाळा बिले स्पीड पोस्ट सेवेव्दारे

 

कोल्हापूर :- शहरातील 1,33,350 इतक्या मिळकत मालक /भोगवटादार यांना सन 2016/17 ची घरफाळा बिले  भारतीय डाक सेवेच्या सहाय्याने स्पीड पोस्ट सेवेव्दारे 20151214_213947-BlendCollageपाठविलेली आहेत. कर्मचारी यांचेकडून हस्तदेय कराचे बिल दिले जाणार नाही किवा कराची रक्कम कर्मचारी यांचेव्दारे जमा करून घेतली जाणार नाही. कराची रक्कम ही नागरी सुविधा केंद्र व बॅकेतच जमा करून घेतली जाणार आहे. याकडे नागरीकांचे लक्ष वेधणेत येत आहे. 
करदात्यास घरफाळा बिल मिळाले नसेल तरी आपल्या मिळकतीचा करदाता क्रमांक सांगून कराची रककम नागरी सुविधा केंद्र (सी एफ सी सेंटर), आय सी आय सी बॅक, ॲक्सीस बॅक व एच डी एफ सी बॅक येथे जमा करणेची सुविधा केलेली आहे. तसेच महानगरपालिका वेब साईटwww.kolhapurcarporation.gov.in येथे बिलाचा तपशील ही प्रसिध्द केलेला आहे. या ठिकाणी know your dues   या विडोवर क्लीक करून कराची रक्कम पहाणेची व्यवस्था आहे.
कराचे बिल मिळाले नाही या सबबीवर दंडाची रक्कम वजा होणार नाही. तसेच जुन 2016 अखेर कराची रक्कम जमा केलेस या वर्षातील कराच्या रक्कमेवर 6 टक्के इतकी रक्कम सुट म्हणून मिळणार आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेचे वतीने केलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!