
कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या जागेची पाहणी आज महापौर सौ.अश्विनी रामाणे यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत केली.
वास्तुशिल्पी अभिजीत जाधव यांनी या समाधीस्थळासाठी तयार करणेत आलेल्या आरखडयाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पहिल्या टप्यात 59 लाखाची निविदा काढण्यात आली असून यामध्ये मुख्य समाधीचे दगडी काम सुरु आहे. एकूण रु.4.18 कोटीचा प्रस्ताव असून यावर्षी उर्वरित कामासाठी 50 लाखाची तरतुद करण्यात आलेली आहे. विकसीत होणारे समाधीस्थळ हे 100 वर्षाचे पुर्वीचे बांधकाम असावे असा आभास निर्माण करणारे होणार आहे. यामध्ये समाधीची मेघडंबरी, शिवाजी महाराज मंदीर, ताराराणी मंदीर, प्रिन्स शिवाजी यांचे मंदीर सुशोभिकरण, आंबेडकर हॉल विकसीत करणे, आर्ट गॅलरी, दगडी फुटपाथ, पार्किंग, कंपौंड इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. मेघडंबरीपाषाणात न बनवता ब्रॉन्झ या धातूपासून करण्यात येणार आहे. यासाठी मोल्डींग करुन तयार करावी लागणार आहे. सदरचे काम संपुर्ण घडीव दगडी असल्याने कामास थोडा वेळ लागत आहे. यासाठी आत्तापर्यंत रु.65 लाख खर्च करण्यात आला आहे अशी माहिती दिली.
यावेळी महापौर सौ.अश्विनी रामाणे यांनी बोलताना सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे व उर्वरित काम निधीअभावी थांबू नये यासाठी समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक असणारा रु.10 कोटी निधी मिळविण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांचेकडे मागणी करु असे सांगितले
Leave a Reply