
कोल्हापूर: श्री महालक्ष्मी मंदीर व परिसर विकास आराखडयाची माहिती सर्व नागरिक व भाविकांना होवून सुविधांच्या अनुषंगीक सुचना घेणेसाठी या आराखडयाचे सादरीकरण आज केशवराव भोसले नाटयगृह येथे संपन्न झाले. पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, खा.धनंजय महाडीक, खा.संभाजीराजे छत्रपती, आ.सतेज पाटील, महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेने श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकासाचा रक्कम रु.255 कोटीचा आराखडा शासनास सादर केला आहे. मा.पालकमंत्री व स्थानिक लोक प्रतिनिधींनी केलेल्या सूचना प्रमाणे प्राधान्याने करावयाच्या कामांचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करणेत आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुरातन वास्तु संवर्धन, पार्किंग सुविधा, पर्यटक सुविधा इ. कामांचा समावेश करणेत आला आहे.
प्रारंभी पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलताना जिल्हयातील अपुर्ण प्रकल्प, आराखडयांचे प्रस्ताव पाठविणेबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामध्ये जोतिबा पर्यटनस्थळाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पंचगंगा घाट विकसीत करणेसाठी रु.23 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदीर विकास आराखडा हा नागरिकांच्या जिव्हाळयाचा प्रश्न असलेने त्याबाबत लोकांच्या सुचना जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आराखडयाचे सादरीकरण ठेवण्यात आले आहे. ज्यांना काही सुचना करावयाच्या आहेत. त्यांनी लेखी स्वरुपात दि.1 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय व कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडे लेखी स्वरुपात देणेत याव्यात अशी सुचना केली. त्यानंतर सदरचा आराखडयास अंतिम स्वरुप देणेसाठी कमिटीची बैठक बोलविण्यात येईल असे सांगितले
Leave a Reply