
कोल्हापूर : कोल्हापूरची माणसे हि जिंदा दिल असतात त्यांचे व्यक्तिमत्व खुले असते या अशा कारणांमुळे कोल्हापूरवर माझे विशेष प्रेम आहे याच करवीर नगरीत शाहू पुरस्कार स्विकारत असताना मला आनंद होत आहे या शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आज १४२ व्या शाहू जयंतीनिमित्त शाहू पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.३१ व राजर्षी शाहू पुरस्कार आज शरद पवार यांना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.शाल श्रीफळ,मानपत्र आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.शाहू महाराजांनी उपेक्षित आणि वंचित वर्गासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. स्त्रिया आणि क्षुद्र यांना सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले. समाज परिवर्तनाची त्यांची भूमिका होती.कष्टकरी वर्गाला त्याच्या घामाचे मोल मिळावे हा हेतू त्यांचा होता.शाहूमहाराज राहिले राजमहालात पण कोल्हापूरच्या गोर-गरीब लोकांच्यात त्यांचे मान जास्त रमले.त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर सुजलाम आणि सुफलाम आहे.असे शरद पवार यांनी पुरस्कार स्वीकारताना गौरव उद्गार काढले.1 लाख रूपये ही पुरस्कारची रक्कम यात आणखी 4 लाख रूपये असे मिळून 5 लाख रुपये शाहू कॉलेज ला एक मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणासाठी देण्यात आले.
गेली ३५ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो.शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हाच मुख्य हेतू आहे असे राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी नमूद केले.
शरद पवार यांना हा शाहू पुरस्कार दिल्याने या पुरस्कराची उंची वाढली.सामन्य आणि शेतकरी यांचे हित जपणारा नेता,आज साखर उद्योग महाराष्ट्रात उभारणे,शेतकऱ्यांची कर्जमाफी या सर्वांचे श्रेय फक्त शरद पवार यांना जाते अशी पोच पावती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक.सौ.प्रतिभा पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील तटकरे,आमदार हसन मुश्रीफ,बंटी पाटील,संध्यादेवी कुपेकर,एन.डी पाटील,निवेदिता माने महापौर सौ.अश्विनी रामाणे,उपमहापौर सौ.शमा मुल्ला,पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे,यांच्यासह राष्ट्रवादी चे कार्यकर्ते,प्रशासकीय अधिकारी,नगरसेवक,मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply