
कोल्हापूर : कोल्हापुरात राजर्षि शाहु महाराजांनी खऱ्या अर्थाने उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली. राजर्षि शाहुंच्या दूरदृष्टीमुळे शेती, उद्योग, व्यापार अशा सर्व क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रणी आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना केवळ भारताचा विकासदर 7.6 टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनच्या तुलनेत भारतात असलेल्या युवा मानव संसाधनाचा उचित वापर केला तर भारत जगाची फॅक्टरी बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
कोल्हापूर येथे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच स्मॅक भवनच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खा. राजू शेट्टी, खा. संजय काका पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, समरजीतसिंह घाटगे, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या देशाला उद्योगाच्या क्षेत्रात अनोखी संधी मिळाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असताना केवळ भारत 7.6 टक्के विकासदर गाठतोय. त्यामुळे भारत औद्योगिक गुंतवणुकीचे स्थान असून, त्यामुळे जागतिक व्यापार आणि उद्योग जगताचे लक्ष भारताकडे आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत गेली 25 ते 30 वर्षे जगाची फॅक्टरी म्हणून चीनची ओळख होती. जगाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये चीनच्या वस्तू होत्या. परंतु, सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. 2010 नंतर चीनची लोकसंख्या वार्धक्याकडे झुकु लागलीय. चीनचा युवा लोकसंख्येचा ऍ़डव्हाटेंज आता संपलाय. त्यामुळे उत्पादकांची संख्या कमी होतेय. त्या पार्श्वभूमिवर आपल्या लोकसंख्येने आपल्याला एक वेगळीच संधी निर्माण करून दिली आहे. आपल्या देशातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षे वयोगटाच्या आतील आहे. म्हणून पुढील 20 ते 25 वर्षे या देशाकडे मोठ्या प्रमाणात मानव संसाधन असणार आहे. त्यामुळे आता जगाची फॅक्टरी चीन राहणार नाही तर भारत जगाची फॅक्टरी बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला.
केवळ विदेशी गुंतवणुकीवर अवलंबून न राहता सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान अवलंबत देशी उद्योगांनीही भरारी मारली आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय उद्योजकांनी जगात नाव कमावले आहे. आता युवा मनुष्यबळही आहे. या दोन्ही गोष्टींचा संगम केला तर जगामध्ये उत्पादन करणारा आणि जगाची फॅक्टरी म्हणून आपला देश विकसित करता येईल. त्याकरिता उद्योग जगताचे योगदान राहणार आहे. उद्योजकांनी हे आव्हान नव्हे तर संधी मानून काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
फौंड्री उद्योगात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रस्ताव केल्यास राज्य शासन पाठिशी राहील, असे सांगून उद्योग जगताच्या समस्यांवर मार्ग काढण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच, केंद्राच्या नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणामुळे कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न तडीस लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्य
Leave a Reply