
कोल्हापूर– रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळाचे ऐतिहासिक संग्रहालय करण्याकरीता 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. छ. शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देवून छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय पाटील, आमदार सतेज पाटील, वसंत मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
छ. शाहू महाराज यांचे कार्य खूप मोठे असून, त्यांनी रयतेच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्याचे जतन व्हावे व त्यापासून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी या जन्मस्थळाच्या वास्तूचे ऐतिहासिक संग्रहालय म्हणून जोपासना करण्यात येणार आहे. समाज विकासाकरिता व समाजाच्या मार्गदर्शनासाठी छ. शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Leave a Reply