
कोल्हापूर : शेतकऱ्याची स्थिती सुधारायची असेल तर शेतीत गुंतवणूक, एकत्रित शेती, शेतीला विपणनाची जोड आणि शेतीवर आधारित उद्योग अशी चतुःसूत्री अवलंबण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसमोर असलेल्या प्रश्नांवर हे उपाय आहेत. 100 वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना हे अचूक निदान करून राजर्षि शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनाचे काम केले आहे. बहुजनांचा विकास हाच देशाचा विकास हा मूलमंत्र शाहु महाराजांनी जाणला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई यांच्या तर्फे राजर्षि शाहू गौरव ग्रंथाच्या तिसऱ्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर अश्विनी रामाणे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, समितीचे सदस्य सचिव व संपादक डॉ. रमेश जाधव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि देशाला विचारांची दिशा आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि शाहू महाराजांना मानाचा मुजरा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाहू महाराजांवरील हा चरित्र ग्रंंथ संपूर्णपणे वास्तववादी व सत्य सांगणारा तसेच संशोधन केलेल्या कागदपत्रांवर आधारित आहे. शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित गोष्टींचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा ग्रंथ पुढील अनेक पिढ्यांना मार्ग दाखवणारा, संशोधकांसाठी उपयुक्त व संग्राह्य असा आहे.
छत्रपती शिवाजीराजांच्या पाणी नियोजनाच्या संकल्पनेतून शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली असल्याचे सांगून दुष्काळावर अचूक उपाय म्हणजे पाण्याचे नियोजन आहे. दुष्काळ पेलण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी राजर्षि शाहूंनी राधानगरी धरण बांधले. कारण छत्रपती शाहूंकडे 100 वर्षांपलिकडचे पाहण्याची ताकद होती, असे ते म्हणाले.
सामाजिक समतेचा संदेश देताना सर्वसमावेशक विकास म्हणजेच बहुजन समाजाला विकास प्रक्रियेत आणण्याचे कार्य राजर्षि शाहू महाराजांनी केले. छत्रपती घराण्याने देश, महाराष्ट्राला, समाजाला विचारांचं मोठं देणं दिलं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून खासदार म्हणून निवड केली असून हा राजर्षि शाहूंच्या विचारांचा सन्मान आहे, असे त्यांनी स्पष्ट केल
Leave a Reply