डिजीटल शिक्षण पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली :मुख्यमंत्री

 

IMG_20160627_000601कोल्हापूर –  शिवाजी  विद्यापीठाने व्हर्च्युअल क्लासरूम सारखी आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे  विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. या  डिजीटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. शिवाजी विद्यापीठाचे हे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवाजी विद्यापीठ येथे वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र इमारतीचे भूमिपूजन, म्युझियम कॉम्लेक्सचे भूमिपूजन, नूतन बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन व नॅशनल इंस्टीट्युशनल रँकिंग फार्मवर्क (एनआयआरएफ) मध्ये विद्यापीठास देशात 28 वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यापीठाच्या गौरव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या प्रकल्प संचालिका मनीषा वर्मा, खा. संभाजी राजे छत्रपती, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी , बीसीयूडीचे संचालक डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतन बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र इमारतीच्या भूमिपूजनच्या  कोनशीला आवरणाचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्युझियम कॉम्लेक्सच्या भूमिपूजनच्या कोनशिलाचे डिजीटल उद्घाटन केले.

डिजीटल अभ्यासक्रमामुळे ग्रामीण व शहरी शिक्षणातील दरी भरून निघण्यास मदत होत आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे भांडार खुले झाले आहे. आजच्या काळात विकासाच्या वाटा या संवाद माध्यमातून जातात. त्यामुळे उच्च शिक्षण देवून पदवीधर तयार करण्यापेक्षा या पदवीधरांच्या ज्ञानाच्या कक्षा कशा रूंदावतील याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्राध्यापक एकाच  वेळी शंभर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. ही मोठी उपलब्धी आहे. तसेच आजच्या काळात प्रगत तंत्रज्ञान अवगत असलेले पत्रकार तयार होणे ही काळाची गरज आहे. पत्रकारांना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाने नवीन आधुनिक अभ्यासक्रमाची निर्मिती करावी. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच इतर चांगल्या गोष्टींसाठी हे सरकार खंबीरपणे साथ देईल.  भविष्यात उभारण्यात येणाऱ्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून सामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहचण्यासाठी कार्य केलेल्या शाहू महाराजांच्या भूमीत शिवाजी विद्यापीठाची ही वाटचाल अशीच चालू राहु दे, अशा शुभेच्छा यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी केंद्र सरकार आग्रही असून, केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. हा पैसा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वापरण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचा योग्यरीत्या विनियोग व्हायला हवा. शिवाजी विद्यापीठाची अनेक पातळ्यांवर यशस्वी वाटचाल सुरु असून शिवाजी  विद्यापीठाने अजून उंचीवर झेप घेण्यासाठी प्रयत्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!