नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत1जुलैला: जिल्हाधिकारी

 

IMG_20160628_200457कोल्हापूर  : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक  डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणीची सोडत 1 जुलै 2016 रोजी दुपारी 3 वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.जिल्ह्यातील 9 नगर परिषदांच्या विभागाच्या प्रभागाचे आरक्षण सोडतीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज देण्यात आले, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. यावेळी आरक्षण सोडत काढण्या संदर्भातील कामकाजाच्या डेमोचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, संजय पवार व स्वाती देशमुख तसेच  जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील, रविंद्र खाडे, संगीता चौगुले, मोनिका सिंह, अश्विनी जिरंगे, किर्ती नलवडे यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार  आदीजण उपस्थित होते.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पात्र नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागाच्या आराक्षण सोडतीचे कामकाज काठेकोरपणे व्हावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, प्रभाग आरक्षण सोडतीचे काम आयोगाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शक सुचनानुसार करावे, यामध्ये कसल्याही प्रकारची हायगय होता कामा नये अशी सूचनाही त्यांनी केली.  प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचे कामकाज पारदर्शी व काटेकोरपणे व्हावे असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांच्या प्रभाग आरक्षण सोडत  1 जुलै 2016 रोजी दुपारी 3 वाजता संबंधित नगरपालिका क्षेत्रात निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. नगरपालिकेचे नाव, आरक्षण सोडतीचे ठिकाण याची माहिती पुढील प्रमाणे-इचलकरंजी-नगरपालिका सभागृह, मलकापूर-नगरपालिका सभागृह, पन्हाळा-नगरपालिका सभागृह, जयसिंगपूर-सिध्देश्वर यात्री निवास हॉल, गल्ली नंबर 4, मुरगूड-यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद, कागल-शाहू नगर वाचनालय, कुरुंदवाड-जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान, गडहिंग्लज-नगरपालिका सभागृह आणि वडगाव-महालक्ष्मी मंगल धाम, नगरपरिषदेजवळ येथे होणार आहे. ही सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!